सर्वगुणसंपन्न सखी बडिशेप (All-rounder Friend Fennel)

 



सर्वगुणसंपन्न म्हटलं की एका आदर्श स्त्रीची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. जणू काही तिने आयुष्यभर कुटूंबाची सेवा करण्याचे व्रत घेतले आहे.

कोण बरं ही सुंदरी ? ही आहे संपूर्ण कुटूंबाची काळजी घेणारी आपली कायमची सोबतीण, चिमुकली गोड बडिशेप. आज हिचं महत्त्व समजून घेऊया.

बडिशेप चे मुख्य गुण (Benefits of Fennel Seeds)

बडिशेप ही थंड प्रकृतीची असल्याने शरीराला थंडावा देते आणि मुख्य म्हणजे पोटातली उष्णता कमी करते. खास करून उन्हाळ्यात बडिशेप सेवनात भरपूर फायदे असतात. जेव्हा नियमितपणे बडिशेप खाणे शक्य होत नाही तेव्हा बडीशेपचे पाणी इथे प्रमूख भूमिका बजावते.


बडिशेप चे पाणी कसे तयार करायचे ?

१) १ ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप या प्रमाणात रात्रभर भिजवून ठेवले जाते. सकाळी हे पाणी उकळून, एक प्रकारे शिजवून हे पाणी थंड करून प्यायले जाते.

(उन्हाळ्यात रात्रभर भिजवून ठेवलेले पाणी खराब होऊन त्याला सकाळी वास येतो व आंबट लागले : माझा अनुभव)

२) किंवा सकाळी याच प्रमाणात दोन्ही जिन्नस घेऊन उकळून थंड करून प्यायले तरीही फायदेशीरच ठरते.


बडिशेपच्या पाण्याचे काय फायदे मिळतात ?

.

• बडिशेप आपली पचनशक्ती मजबूत करते. यामुळे भुकही वाढते आणि खाल्लेले सहजपणे पचण्यास मदत होते कारण बडिशेप मध्ये फायबर आहे.

• भारतात बडिशेप ही दळण्याच्या, साठवणुकीच्या सर्व मसाल्यांमध्ये तसेच जेवणात, वाटणांत सर्वच पदार्थांत वापरात येते आणि आपल्याला कायम निरोगी ठेवते.


• बडीशेप केसांची स्थिती सुधारते. बडिशेप मध्ये लोह  (Iron), आम्ल (citric acid), नियासिन (vitamin B3), फोलेट  (vitamin B9),  तांबे (copper) असल्यामुळे केसांना नवजीवन मिळते. यातून केसांच्या वाढीसाठी चालना मिळून केसांची मुळे अत्यंत मजबूत होतात. ज्यामुळे केस गळणे थांबून नव्याने केसांची नियमित वाढ सुरू होते.

.

• बडिशेप पोटदुखी, पोट फुगणे, मळमळ, उलट्या इ. त्रासापासून सुटका करते. पोटात गॅसेस तयार होऊ देत नाही व आतड्याची हालचाल सोपी करते. पोट फुगणे, छातीत जळजळ होणे, पोटात गोळा येणे सर्व टळते. इतकेच नाही तर बडिशेप अतिसार (loose motions) देखील नियंत्रणात ठेवते. तसेच बद्धकोष्ठता (constipation) पूर्णपणे टाळते.

.

• श्वसनाची दुर्गंधी देखील बडिशेप दूर करते. यामध्ये असणारे व्हिटॅमिन A आपली दृष्टी सुधारते. यात असणारे इथेनॉल मोतिबिंदूची प्रगती अतिशय मंद करते. व सुजलेल्या डोळ्यांवर  उपचार करण्यासाठी उपयोगी ठरते.

.

• बडिशेप ही त्वचेची  निगा उत्तम रित्या राखते. कारण तिच्यात खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. आणि म्हणूनच बडिशेपच्या नित्य सेवनामुळे त्यात असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स त्वचा गोरी बनवतात.

• पिंपल्स आणि मुरुमं कमी होतात. यामध्ये  असणारे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांची वाढ रोखतात. त्वचेला थंडावा मिळतो. बडिशेप थंड प्रकृतीची असल्यामुळे उन्हाळ्यात आपली त्वचा थंड ठेवते.


• त्वचेची आग आग होणं आणि सूज देखील कमी होते. बडिशेपमधील अँटीइन्फ्लेमेटरी गुण त्वचेवरील सूज आणि लालसरपणा कमी करतात. त्वचा हायड्रेटेड राहते. बडिशेपचे पाणी पिण्याने त्वचा कोरडी न होता कायम मऊ व तजेलदार राहते.

• बडिशेप त्वचेला विषारी घटकांपासून मुक्त करते  शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी दिसू लागते.

.

• बडिशेपमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा घटक (antioxidant) आहे

ऍंटीऑक्सिडंटचे फायदे :

• ऍंटीऑक्सिडंट फ्री रेडिकल्सशी लढा देऊन पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात.

• वृद्धत्वाची प्रक्रिया धीमी होते. त्वचेवर व शरीरावर वृद्धत्वाचे परिणाम उशिरा दिसू लागतात, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी राहते.

• हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.

• काही अभ्यासानुसार ऍंटीऑक्सिडंट्स कर्करोगाच्या धोक्यापासूनही काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतात.

• सुधारण्यात मदत: मेंदूच्या पेशींचे संरक्षण होऊन स्मरणशक्ती चांगली राहते.

• विशेषतः व्हिटॅमिन A, C आणि E यांसारखे ऍंटी ऑक्सिडंट्स डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात.

• शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती उत्तम रित्या सुधारते.

.

 • बडिशेप तोंडात लाळ निर्माण करते.

• लाळ (saliva) ही आपल्या तोंडातील एक नैसर्गिक आणि खूप महत्त्वाची द्रवपदार्थ आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे खाली दिले आहेत:


लाळेचे फायदे:

• लाळ अन्न पचवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

• लाळ तोंडात अडकलेले अन्नकण स्वच्छ करते आणि तोंडाला सतत ओलसर ठेवते.

• लाळेतले नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरियांची वाढ कमी करतात.

•लाळेमुळे दातांवरील अ‍ॅसिड कमी होते आणि दात किडण्यापासून वाचतात.

• लाळ तोंडातल्या जखम सहज भरून काढते.

• लाळ चव स्वाद समजण्यास मदत करते आणि अन्न रूचकर लागते.

• लाळेमुळे तोंड ओलसर राहत असल्याने बोलताना जिभेची हालचाल नीट होते.

• लाळ अन्ननलिकेतील अ‍ॅसिड कमी करून अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून दिलासा देते.

.

बडिशेप दमा व इतर श्वसनरोग कमी करते. बडिशेप मध्ये जास्त प्रमाणात असणारे फायटोन्यूरट्रीएंटस सायनस दूर करण्यासाठी, दमा व इतर श्वसन विकार कमी करण्यासाठी मदत करतात.

• फायटोन्युट्रिएंट्स रोगप्रतीकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांपासून संरक्षण करण्यासाठी खूप उपयुक्त असतात.

• काही फायटोन्युट्रिएंट्स कर्करोग विरोधी गुणधर्म असलेले असतात. ते पेशींच्या असामान्य वाढीला आळा घालतात.

• रक्तदाब नियंत्रित ठेवतात, कोलेस्टेरॉल कमी करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.

• काही फायटोन्युट्रिएंट्स (जसे लुटीन व झॅन्थॅथिन) डोळ्यांच्या आरोग्यास मदत करतात.

• सांधेदुखी, त्वचा विकार किंवा अंतर्गत दाह कमी करण्यात मदत करतात.

• वृद्धत्वाची प्रक्रिया धीमी करतात. त्वचेला तरुण ठेवतात व वृद्धत्वाचे लक्षणे उशीराने दिसू देतात.

• यामुळे वजन कमी होते. पचनक्रिया नियमित होते. चयापचय वाढते. चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला चालना देते.

.

बडीशेप शरीरातील रक्त शुद्ध करण्यात व शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते.

लठ्ठपणाने ह्रदयविकाराचा झटका किंवा मधुमेहासारखे आजार सहज उत्पन्न होतात. त्यावर उपाय म्हणून बडिशेप ही वजन नियंत्रणासाठी व शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करते.

१०

• यातून ऑस्टीओपोरोसिसचा धोका कमी होतो. 

ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) म्हणजे हाडांची घनता (bone density) कमी होणे व हाडं कमजोर होणं. यामुळे हाडं सहज तुटण्याची शक्यता वाढते — विशेषतः कमरेचा भाग, मनगट, मणका (spine) इत्यादी ठिकाणी.

• पाठीचा कणा वाकणे किंवा उंची कमी होणे

• हाडं पटकन तुटणे

• पाठदुखी (विशेषतः मणक्याच्या ठिकाणी)

• सहज थकवा किंवा हालचालीत अडचण

• वय वाढणे (विशेषतः ५० वर्षांनंतर)

•स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर (Menopause) इस्ट्रोजेनची कमतरता.

•कॅल्शियम व व्हिटॅमिन D ची कमतरता.

• व्यायामाचा अभाव.

• धूम्रपान व मद्यपान

• दीर्घकाळ काही औषधांचा वापर (जसे की स्टेरॉइड्स) अशा त्रासापासून दूर ठेवते.

• वाचून दमला असाल तर थोडी विश्रांती घ्या. इतकेच फायदे नसून  अजूनही बरंच काही सांगणं बाकी आहे. हार्मोनल संतुलन करणे, हायपरथायराइडिझम थांबवणे, रजोनिवृत्तीचा त्रास संपवणे, मासिकपाळीच्या वेदना कमी करणे, निद्रानाश दूर करणे, शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवणे....अशी ही यादी वाढतच जाईल.

•दिवसभरातून फक्त एकदा हे पेलाभर पाणी पिणं इतके सारे फायदे देतं. थोडक्यात काय, निसर्गाच्या या मदतीचा आपण आपले मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी नक्कीच फायदा करुन घेऊया आणि इतरांनाही सांगुया. करून पहा आणि आपले अनुभव मलाही सांगा.

• चला तर स्वतः सोबत आपल्या ओळखीच्या प्रत्येकाचे जगणे ही माहिती देऊन सोपे करूया आणि निरोगी जीवनासाठी तयार राहूया.

• शुभेच्छा. 🌹

• गुगलचे मनापासून आभार. 

Comments