चटपटीत लसणाचे १० फायदे (10 Benefits of Garlic)
शारीरिक आरोग्य
आल्या (Ginger) सोबत हातात हात घालून येणारा हाच तो हिरो लसूण. आता माझा मित्र आलं (Ginger) मागच्या लेखात जर एवढा भाव खाऊन गेला, तर मग मी का म्हणून मागे राहू ? असं म्हणत आज लसूण आपल्याला भेटायला आला आहे. जेवणात प्रत्येक पदार्थात नेहमी हजेरी लावणारी आणि अन्न अधिक रूचकर बनवणारी आले लसूण ही एक फेमस जोडी आहे. चला तर मग, आज आपण या लसणाचे भरपूर आरोग्यदायी फायदे पाहूया.
लसणात आढळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे
१) प्रत्येक लसूण पाकळीत व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K, कॅल्शियम, लोह (Iron), पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन E आणि मॅंगेनीज असते.
विविध व्हिटॅमिनन्स चे फायदे:
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
- शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवते
- सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गांपासून रक्षण करते.
- त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
- कोलेजन निर्मितीत मदत करते, ज्यामुळे त्वचा तजेलदार आणि तरुण दिसते. डाग, सुरकुत्या कमी होत राहतात.
- शरीरात होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करते, ज्यामुळे कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
- अन्नातून मिळणाऱ्या लोह तत्त्वाचे पोषण लसूण वाढवतो ज्यामुळे ऍनिमिया टाळता येतो.
- यातील कोलेजनमुळे हाडे, दात आणि सांधेदुखीच्या समस्या नष्ट होतात.
- जखमा भरून येण्यास मदत होते:
- शरीरात जखम भरून येण्याची प्रक्रिया जलद होते.
- मानसिक आरोग्यासाठी मदत होते:
- मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त असून मूड सुधारण्यात मदत करू शकते.
२) लसणाच्या एका पाकळीत कॅलरी (अनावश्यक वजनवाढ) जवळ जवळ नसतेच. मुळात जेवण तयार करताना लसूण अत्यंत कमी प्रमाणात वापरला जातो आणि त्यामुळे लसूण आहारातील कॅलरीजवर परिणाम करत नाही.
३) आपण खरपूस तळून, परतून किंवा ओव्हनमध्ये शिजवून लसूण खातो. पण कच्चा लसूण हा त्याहून अधिक फायदेशीर ठरतो.
४) ऍलिसिन हा लसणातील एक प्रभावी घटक कच्च्या लसणात मोठ्या प्रमाणात आढळतो.
ऍलिसिन चे फायदे:
- शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती उत्तमरित्या वाढवतो.
- ह्रदयाचे आरोग्य उत्तम ठेवतो,
- कोलेस्टरॉल कमी करतो,
- रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात आणतो,
- कॅन्सरशी लढतो,
- श्वासोच्छवास उत्तम रित्या नियंत्रणात ठेवतो
- ताप, खोकला, डोकेदुखी, सायनस, अस्थमा नियंत्रणात ठेवतो.
आणि म्हणूनच लसूण नारळाची कच्चीचटणी, कच्चा कांदा लसूण घालून केलेले वांग्याचे रूचकर भरीत, कांदा लसणाचे कच्चे मिश्रण तेल तिखट मिठात कालवून भाकरी सोबत खाल्ले जाते.
५) बहिरेपणा, कुष्ठरोग, संधीवात, मुळव्याध, यकृताचे आजार, पित्ताशयाचे आजार, डांग्या खोकला, रक्तदोष, घटसर्प इ. आजारांवर देखील लसूण गुणकारी ठरतो.
६) दमा, अस्थमा, ब्रॉंकायटिस, श्वासोच्छवास त्रास होणे इ. त्रासांवर देखील लसूण गुणकारी ठरतो. चक्कर आलेल्या माणसालाही लसणाचा वास शुद्धीवर आणू शकतो.
७) शरीरातील रक्ताच्या गुणांमध्ये ठराविक कमतरता असल्यास लसूण मदतीला येतो.
- लसूण आहारात समाविष्ट केल्याने रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते.
- लसूण लोहयुक्त पदार्थां सोबत घेत गेल्यास रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
८) लसूण वजन कमी करण्यात मदत करू शकतो, कारण तो मेटाबॉलिझम वाढवतो, भूक कमी करतो आणि चरबी जाळण्यास प्राधान्य देतो. हे मुख्यतः ऍलिसिन सारख्या घटकांमुळे होते.
- लसूण मेटाबॉलिझम वाढवतो. लसणा मध्ये असे काही घटक असतात जे मेटाबॉलिझम वाढवतात, त्यामुळे शरीर अधिक उष्मांक (कॅलरीज) जाळते, अगदी विश्रांतीच्या अवस्थेतसुद्धा.
- लसूण भूक कमी करतो, ज्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटत राहतं आणि त्यातून अनावश्यक येता जाता खाणं सहजच टाळता येतं.
- लसूण चरबी जाळतो. काही संशोधनानुसार, लसूण शरीरातील चरबी जाळण्याचं प्रमाण वाढवतो,ज्यामुळे वजन कमी होण्यास भरपूर मदत होते.
- लसूण पचनशक्ती सुधारतो, ज्यामुळे पोषक तत्त्वांचे योग्य प्रमाणात शोषण होते आणि पचनाशी संबंधित त्रास कमी होतात. हे कारण देखील अप्रत्यक्षपणे वजन कमी होण्यास मदतीचे ठरते.
९) सांधेदुखी बरी करण्या करिता लसूण खूप गुणकारी ठरतो.
- लसणात असणाऱ्या वेदना कमी करण्याच्या गुणधर्मांमुळे सांधे दुखी पासून बऱ्याच प्रमाणात आराम मिळू शकतो.
- लसूण सूज कमी करून सांध्यांमध्ये नियमित रक्तप्रवाह सुरू करू शकतो.
- लसणा मध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे सांधेदुखी व साध्यांवरची सूज कमी होण्यास सहज मदत होऊन सांधांच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते.
- काही संशोधनांनुसार, लसूण खाल्ल्यामुळे किंवा त्याचे पूरक आहार घेतल्यामुळे सांधेदुखी आणि लवचिकता गेल्यामुळे सांध्यांमध्ये आलेली ताठरता कमी होण्यास मदत होते.
- लसूण सांध्यांमध्ये रक्तप्रवाह वाढवू शकतो, ज्यामुळे हालचालींमध्ये सहजता येते.
आयुर्वेद आणि लसूण
- आयुर्वेदात लसणाचा वापर स्नायू आणि सांधेदुखीसाठी केला जातो. पारंपरिक पद्धतींमध्ये लसूण पेस्ट लावणे किंवा लसणाच्या तेलाने मालिश करणे इ. गोष्टींचा यात समावेश केलेला आढळतो.
लसूण आणि तेल एकत्र करून बनवलेले लसणाचे तेल दुखत असलेल्या सांध्यांवर किंवा सूजलेल्या स्नायूंवर लावून मालिश करून स्नायूंना आराम देता येतो.
१०) लसूण ह्रदय विकार दूर ठेवतो
- लसूण, विशेषतः त्यामधील ऍलिसिन नावाच्या सक्रिय घटकामुळे, रक्तदाब कमी करण्यात मदत करू शकतो. उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा एक प्रमुख धोका आहे.
- काही संशोधन असे सूचित करतात की लसूण एकूण आणि LDL ("वाईट") कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात मदत करू शकतो, ज्यामुळे हृदय आरोग्य सुधारते.
- ऍलिसिन नावाचा गंधयुक्त सल्फरयुक्त घटक लसणा मध्ये असतो, जो रक्तवाहिन्या सैल करण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. हाच घटक लसणाचे हृदयासाठी फायदेशीर गुणधर्म देतो.
- लसूण प्लेटलेट्सच्या चिकटण्याची प्रक्रिया होते ती (aggregation) कमी करू शकतो, ज्यामुळे रक्ताच्या गाठी (ब्लड क्लॉट्स) बनण्याचा धोका कमी होतो. या गाठी हृदयविकार व स्ट्रोकचे कारण बनू शकतात.
- लसूण चरबी तयार करणाऱ्या एंझाइम्सवर परिणाम करून कोलेस्टेरॉल कमी करू शकतो.
• हुश्श!!!
• वाचून थकला असाल, पण निसर्ग मदत करताना कधीच थकत नाही. तो हजारो हातांनी आपल्यावर त्याचं अमर्याद प्रेम उधळत राहतो. पित्याप्रमाणे आपला सांभाळ करतो. आपल्या निरोगी, सुदृढ, आनंदी आयुष्या करिता, मदत करत राहतो आणि आपण त्याच्या प्रेमाला समजून न घेता झाडे तोडतो आणि सिमेंट कॉंक्रिटच्या जंगलात आयुष्यभर उत्तम आरोग्याच्या शोधात भटकत फिरतो.
निसर्गावर प्रेम करा. आपल्याला निरोगी आयुष्य देणारा आपला पिता आता हरवत चाललाय. त्याला आपणच संपवतोय. वेळ निघून जाण्याआधी जागे होऊया. झाडे लावुया आणि झाडांची निगा राखुया.
शुभेच्छा.
महत्वाची सूचना:
• डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त महत्त्वाचं आहे.
लसूण हृदयासाठी फायदेशीर असला तरी, तुम्हाला आधीपासून काही आरोग्य समस्या असतील किंवा औषधे घेत असाल, तर आहारात कोणतेही महत्त्वाचे बदल करण्या आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
• सदर माहिती सामान्य ज्ञान आणि दैनंदिन जीवनात उपयोगी अशा गोष्टींचा परिचय व्हावा याकरिता देण्यात आलेली आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय घरगुती उपचार करत राहण्याची चूक करू नये ही नम्र विनंती.
• आपल्या निरोगी जीवनासाठी भरपूर शुभेच्छा.
• गुगल.कॉम चे आभार.
Comments
Post a Comment