उन्हाळ्यातील चिडचिड कमी करण्यासाठी टिप्स (Tips To Manage Mood Swings for Summer Season)
हे मला होतंय काय?
✓ मला खूप चिडचिड होते आहे.
✓ मी विनाकारण वाद घालतोय.
✓ काही खावंसं वाटत नाही. भूक मेली आहे.
✓ थकवा येतोय. काही करावसं वाटत नाही.
✓ कुणाशीही बोलण्याची इच्छा नाही.
✓ नुसता कंटाळा येतोय.
उन्हाळ्यात होणारी चिडचिड, मानसिक शारीरिक थकवा याचं कारण म्हणजे शरीरातील कमी होणारं पाणी (डिहायड्रेशन), मेलेली भूक, झोपेच्या तक्रारी, तणाव या सगळ्या मुड स्विंग्ज ची कारणे, परिणाम आणि उपाय चला जाणून घेऊया.
मुड स्विंग्जज का होताहेत ?
१. डिहायड्रेशन आणि उष्ण तापमान (Dehydration and Heat)
✓ वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते.
✓ यामुळे मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि योग्य पोषण मिळण्यात अडचणी येतात.
✓ यातून चिडचिड, डोकेदुखी, थकवा अशी लक्षणे सतत होताना दिसून येत राहतात.
कारण:
• घराबाहेर पडण्याआधी थोडे पाणी पिणे विसरून गेलो.
• सोबत पाण्याची एक बाटली नेणं राहून गेलं.
• अध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पित रहाणं कामाच्या गडबडीत विसरायला झालं.
२. आहारातही बदल (Dietary Changes)
✓ उन्हाळ्यात तर्री दार, मसालेदार, तिखट, तेलकट, तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाण्यात आले की पचनसंस्था बिघडते. पोट अस्वस्थ रहाते.
कारण:
• पचनासाठी कठीण आणि जड असणारे पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात
• अर्थातच त्यामुळे मन अस्वस्थ आणि बेचैन होत रहाते.
३. थकवा आणि उत्साह नसणे
(Fatigue and Low Energy)
✓ सतत घाम येण्याने शरीरातील मीठ (सोडियम) कमी होत जाते.
✓यातून थकलेपणा अगदी स्पष्ट जाणवत रहातो आणि कोणत्याही गोष्टी करिता उत्साह राहत नाही. कंटाळा घेरतो. हालचाली मंदावतात.
कारण:
• नेहमी प्रमाणे घराबाहेर फिरत असताना सध्या आपण कडक उन्हात फिरतो आहोत याचे भान आपण ठेवत नाही.
✓ मीठ घालून सरबत प्यालला हवे ही गोष्ट आपण पूर्णपणे दुर्लक्षित ठेवतो.
४. झोपेच्या तक्रारी (Sleep Disturbance)
✓ उन्हाळ्यात जास्त तापमान आणि घामाची चिकचिक यामुळे शांत निवांत झोप मिळणे कठीण होते.
✓ झोपेतही आपण अस्वस्थता, बेचैनी अनुभवतो.
✓ दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अंग जडावलेले, आळस, चिडचिड, अस्वस्थता जाणवते. उत्साह नसतो.
कारण:
• सतत जाणवत राहणारे उष्ण तापमान आपला उत्साह हरवते. त्यातून निर्माण झालेली बेचैनी आपल्याला चिडचिडे करते.
मुड स्विंग्जना नियंत्रणात कसे आणू ?
१. शरीर हायड्रेटेड ठेवा (Stay Hydrated)
✓ आठवणीने दिवसभर थोडे थोडे पाणी पित रहा.
✓ दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी पोटात जाईल याची नोंद ठेवा.
✓ शहाळे, ताक, ORS, फळांचे रस या गोष्टी आलटून पालटून पित रहा.
✓ लिंबू सरबत, ग्रीन टी यांचाही दिनक्रमात आवर्जून आस्वाद घ्या.
२. योग्य आहार घ्या (Eat a Cooling Diet)
✓ उन्हाळ्यात पचनासाठी जड, तेलकट पदार्थ आवर्जून टाळा. (अती प्रमाणात मांसाहार, पिझ्झा, बर्गर, मसालेदार नॉनव्हेज इ.)
✓ फळे खाण्यात सातत्य ठेवा.
✓ कलिंगड, संत्री, टरबूज, द्राक्षे अशी रसाळ फळे आवर्जून पोटात जाऊ द्या.
✓ कोशिंबीरी, ताक, दही-भात, सुप्स यांचा आहारात नक्की समावेश करा.
✓ पालेभाज्या आवर्जून खात रहा. पचनास हलकी अशी मऊ खिचडी आहारात समाविष्ट करा.
३. झोपेची गुणवत्ता सुधारा (Improve Sleep Quality)
✓ झोपायला जाई पर्यंत मोबाईल, टीव्ही पाहत बसणे टाळा.
✓ झोपण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ करा.
✓ कॉटनचे हलके फुलके कपडे घाला.
✓ खोलीत खिडक्या उघड्या ठेवून नैसर्गिक हवा खेळू द्या.
✓कॉटनच्या पातळ थंड चादरी रात्री वापरा.
४. तणाव व्यवस्थापन करा (Manage Stress)
✓ झोपण्यापूर्वी थोडा वेळ ध्यानधारणा करून मन शांत व स्थिर करा.
✓ कपालभाती, अनुलोम विलोम करत जा.
✓ झोपण्यापूर्वी शांत संगीत ऐकणे सोयिस्कर ठरेल.
✓ ताण हलका होईल. शांप निवांत झोप येईल.
५. उन्हाळ्यात हालचाली सुरू ठेवा (Stay Active)
✓ व्यायाम सकाळी लवकर किंवा सुर्यास्तानंतर करा. दुपारच्या कडकडीत उन्हाच्या वेळेस व्यायाम करणे आवर्जून टाळा.
✓ झाडांच्या सावलीत, संध्याकाळी असणाऱ्या गार वातावरणात किंवा बागेत चालण्याचा सराव दररोज ३० मिनीटे नियमितपणे करा.
✓ स्विमिंग, योगाभ्यास इत्यादी गोष्टी करत रहा. घरी एका जागेवर बसून सुस्ती येणं, निरूत्साही वाटणं दूर करण्यासाठी हालचाली होत राहू द्या. ऐक्टिव रहा.
निष्कर्ष:
• वाढत्या तापमानामुळे मुड स्विंग्ज होणे ही एक सामान्य गोष्ट आहे.
• योग्य आहार, हायड्रेशन, शांत झोप, तणाव व्यवस्थापन आणि हलका फुलका आहार या गोष्टींची मदत घेऊन त्यावरही मात करता येऊ शकते.
• रोजच्या दिनक्रमात थोडे बदल केल्याने तुमची चिडचिड आणि मानसिक थकवा दूर होऊ शकतो.
• उन्हाळा देखील आनंदी भावना घेऊन येऊ शकतो.
• आपणां सर्वांना उन्हाळ्याच्या आरोग्यदायी शुभेच्छा.
• गुगलचे मनापासून आभार.
• धन्यवाद. 🙏
Comments
Post a Comment