शीतपेयांचे दुष्परिणाम (Side effects of Cold Drinks)

शारीरिक आरोग्य 

उन्हाळा आणि कोल्ड्रिंक्स हे समानार्थी शब्दांसारखे गळ्यात गळा घालून एकत्र येतात. पण येताना ते सोबतीला अनेक त्रास फ्री मध्ये घेऊन येतात. आपण त्या त्रासांकडे काणाडोळा करून आस्वाद तर घेतो, पण त्यापुढे काय काय झेलावे लागेल हे मात्र विसरून जातो. इथे आपण त्या होऊ शकणाऱ्या त्रासांचा एक आढावा घेऊया.

असह्य गर्मी, टपटप करणारा घाम, घशाला पडणारी कोरड आणि काही तरी गारेगार प्यावं अशी अनिवार इच्छा कोल्ड्रिंक्स ताबडतोब पूर्ण करतात. पण त्यालाही काही मर्यादा आवश्यक आहे. आज त्या फायद्या तोट्यांना एकदा जवळून पाहूया.

कोल्ड्रिंक्स पिण्याचे दुष्परिणाम (Side Effects of Cold Drinks)

१. साखरेचे प्रमाण जास्त असणे.

भारतातील अनेक अभ्यासाकांनी सॉफ्ट ड्रिंक्सच्या अतिसेवनाचा संबंध टाइप 2 मधुमेह, लठ्ठपणा आणि कीटकनाशकांच्या दूषिततेशी जोडला आहे.

२. अतिशय लठ्ठपणा 

सॉफ्ट ड्रिंक्समध्ये असलेली जास्त साखर अतिरिक्त कॅलरीज देते, ज्यामुळे वजन वाढण्याचा आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. हा लठ्ठपणा पुढे अनेक आजार निर्माण करतो.

३. हाडे कमकुवत होणे.

कार्बोनेटेड ड्रिंक्स ही फॉस्फोरस ऍसिडयुक्त असतात जी हाडांच्या मजबूती करिता अत्यंत आवश्यक अशा कॅल्शियम च्या पोषणासाठी भरपूर बाधा आणतात. जास्त प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स सेवन केल्यास ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) हा त्रास हमखास संभवतो.

४. पचनाच्या तक्रारी.

सोडा आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स पचनासाठी हानीकारक मानली जातात.‌यातून ऍसिडिटी आणि गॅसेसच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

५. ह्रदयविकाराचा धोका.

अधिक प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स पित्तामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब (BP) यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. ज्यातून ह्रदयाचे त्रास संभवतात.

६. त्वचेच्या समस्या 

हीच कृत्रिम साखरेमुळे व कृत्रिम रंग यातून त्वचेच्या समस्या निर्माण होतात. तेलकट त्वचा, अर्ली एजिंग या आणि यासारख्याच अनेक समस्या निर्माण होतात.

७. डिहायड्रेशन समस्या 

कॅफेन व अतिरिक्त साखरेतून शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.

८. किडनीचे आजर

किडनी स्टोन आणि किडनी च्या कार्यक्षमतेवर परिणाम होणे या समस्या उद्भवु शकतात.

साखरयुक्त सॉफ्ट ड्रिंक्समुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होण्याचा धोका वाढतो.

९. कीटकनाशकांची दूषितता

Centre for Science and Environment (CSE) या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, भारतात विकल्या जाणाऱ्या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये उच्च प्रमाणात कीटक नाशके आढळली आहेत, जे अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.

१०. दातांच्या समस्या 

 सॉफ्ट ड्रिंक्समध्ये असलेल्या आम्लामुळे (ऍसिड) दातांचे इनॅमल नष्ट होते आणि पोकळी (कॅव्हिटी) निर्माण होते

अभ्यास आणि निष्कर्ष:

✓ CSE अभ्यास: प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये भारतात विकल्या जाणाऱ्या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कीटकनाशकांचे प्रमाण जास्त आढळले.

✓ सॉफ्ट ड्रिंक्स आणि मधुमेह: एका अभ्यासानुसार, आठवड्यातून ४ ते ५ किंवा अधिक वेळा सॉफ्ट ड्रिंक्स पिणाऱ्यांमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अतिशय जास्त वाढलेला आढळला.

✓ कमी दर्जाचे सॉफ्ट ड्रिंक्स कृत्रिम गोडसर पदार्थ वापरतात, ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

 वैज्ञानिकांनी कीटकनाशकयुक्त दूषितता आढळल्या नंतर, भारतातील अनेक राज्यांनी शाळा आणि महाविद्यालयां मध्ये काही सॉफ्ट ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

महत्त्वाच्या गोष्टी:

✓ सॉफ्ट ड्रिंक्समध्ये आढळणारी जास्त साखर वजन वाढ, मधुमेह आणि इतर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरलेली दिसून येते

✓ कृत्रिम गोडसर पदार्थ हे  काही सॉफ्ट ड्रिंक्समध्ये  सतत वापरले जातात, जे आरोग्यासाठी निश्चितच हानिकारक  ठरू शकतात.

✓  कीटकनाशकांचे अवशेष ही  फारच गंभीर बाब आहे. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये  आढळणारी कीटकनाशके आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात.

 ✓ सूक्ष्मजैविक दूषितता: प्लास्टिकच्या बाटल्यांना काचेच्या बाटल्यांपेक्षा जास्त गुळगुळीतपणा, हायड्रोफोबिसिटी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज असतो, ज्यामुळे त्यांच्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते.

भारत सरकारची भूमिका:

• भारत सरकारने नागरिकांना  सॉफ्ट ड्रिंक्स टाळण्याचा सावधानतेचा  इशारा दिलेला आहे.

• तेव्हा आता पुढे काय करायला हवं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपलं निरोगी जीवन असं सहज व्याधींच्या हवाली करायचं की डोक्याचा वापर करून यावर पर्याय शोधायचा हे फक्त आपल्या हातात आहे. जीवन अनमोल आहे. ते जपणं आपलं कर्तव्य आहे.  हे सगळं ध्यानात घेऊन आपण या उन्हाळ्यात स्वतःला आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवुन आनंद साजरा करूया. चला! उन्हाळ्याचे स्वागत करूया.

• निरोगी उन्हाळ्या करिता अनेक शुभेच्छा. 

• गुगल.कॉमचे मनापासून आभार.🙏

Comments