मनाचे व शरिराचे आरोग्यपूर्ण नाते (Relation of Mental and Physical Health)
• आयुष्यात हक्काचा सवंगडी म्हणजे आपला जोडीदार. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं हे एक निराळंच नातं असतं. घटकेत कडकडून भांडायचं आणि कालांतराने गुलुगुलु करायला बसायचं. असंच एक नातं आहे, शरीराचं आणि मनाचं. हे दोन्ही घटक सतत एकमेकांवर अवलंबून असतात. पाहूया कसे जगतात दोघं एकमेकांच्या आधारावर, एखाद्या जोडप्याला लाजवतील असे जोडीदार आपले "शरीर आणि मन."
मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्यावर पडणारा प्रभाव.
जर एखादी व्यक्ती कायम ताण, तणाव, चिंता, नैराश्य या न संपणाऱ्या व्याधींनी त्रस्त असेल तर त्या सगळ्याचा परिणाम शरीरावरही होत राहतो.
१. उच्च रक्तदाब आणि ह्रदय विकार
✓ मानसिक तणाव हा रक्तदाबाच्या समस्या (Blood Pressure) निर्माण करतो.
✓ रक्तदाब नियंत्रणात न ठेवल्यास त्यातून ह्रदविकाराचा धोका निर्माण होतो.
२. डोकेदुखी आणि अपचन
✓ चिंता आणि तणाव तीव्र स्वरूपाची डोकेदुखी निर्माण करू शकतो.
✓ऍसिडिटी, बद्धकोष्ठता(Constipation) किंवा अतिसार (Loose Motions) यातील कोणताही त्रास सुरू करू शकतो.
३. झोपेच्या समस्या
✓ मानसिक तणावामुळे रात्री झोप येत नाही.
✓ झोप लागली तरीही ती अखंड स्वरूपात न राहता मध्ये मध्ये एक सारखी जाग येत राहते.
✓ किंवा दिवसा देखील अतिशय झोप येत राहते.
४. आळस आणि थकवा
✓ अशक्तपणा जाणवत राहतो.
✓ थकवा दिवसेंदिवस वाढत जातो.
✓ कोणत्याही कामात रस राहत नाही.
✓ आळसावलेली वृत्ती कायम राहते.
शारीरिक आरोग्याचा मानसिक आरोग्यावर पडणारा प्रभाव.
जर माणसाला एखाद्या शारीरिक आजाराने त्रस्त केले असेल तर त्या गोष्टीचा त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
१. मधुमेह आणि हृदयविकार वगैरे.
✓ हे दिर्घकाळ चालणारे आजार आहेत ज्यामध्ये सतत औषधे, पत्थ्ये, काळजी घेणे चालते
✓ अर्थात मन निराशेने घेरले जाते
✓ आरोग्याची चिंता पाठलाग करत राहते.
✓ तणाव, नैराश्य येते
२. शारीरिक वेदना आणि नैराश्य
✓ दुखऱ्या भागाची सतत होणारी जाणिव मनाचा आनंद संपवते.
✓ सांधेदुखी साध्या सोप्या हालचालीत देखील भयंकर वेदना देते.
✓ समाजात वावरणे जवळ जवळ अशक्य करते
✓ एकटेपणाची भावना मनाला उदास करते.
३. आत्मविश्वास संपतो
✓ समाजापासून दूरवर कुठेतरी एकटे येऊन पडल्या सारखे वाटते.
✓ समाजात, आप्तस्वकियांमध्ये वावरण्याचा आत्मविश्वास हळूहळू संपत जातो.
✓ आपली आवश्यकता आता संपलेली आहे याची खंत मनाला कुरतडत राहते.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपाय कोणते ?
१. नियमित व्यायाम करा
✓ आळसाला दूर ढकलून नित्यनेमाने व्यायाम करा.
✓ ज्यामुळे शरीरातील प्रत्येक नस ऍक्टिव होते.
✓ शरीराला लवचिकता येते. (Flexibility)
✓ व्यायामाने मन प्रसन्न होत राहते.
✓ शारीरिक आणि मानसिक निरोगीपणा अनुभवास येतो.
२. संतुलित आहार नियमितपणे घ्या
✓ आहाराविषयी दक्षता ठेवणे फायद्याचे राहते.
✓ कोणत्या गोष्टी नियमितपणे खायच्या आणि कोणत्या गोष्टी पूर्णपणे टाळायच्या या गोष्टी सुरुवातीला कठीण भासल्या तरीही कालांतराने सवयीचा भाग बनतात.
✓ योग्य आहार सुदृढता तर देतोच पण अनेक त्रास संपून मनही आनंदी, ताजेतवाने राहते.
३. योगासने आणि ध्यानधारणा
✓ योगासने ही तर प्रकृती सुदृढ राहण्यासाठीची एक सहज सोपी गुरूकिल्ली आहे.
✓ नियमित योगासने केल्यास आरोग्या सोबत मनही ताण तणाव विरहित होऊन आनंदी राहते.
✓ ध्यानधारणा मन शांत निवांत तणावमुक्त करते.
४. सुंदर झोप घ्या
✓ रात्रीची झोप पूर्ण न झाल्यास दिवसा अनेक शारीरिक त्रास सुरू होतात.
✓ म्हणूनच सतत लोळणे, दुपारी झोपणे, दिवसभर आराम करत राहणे या सवयी सोडून लहान मोठ्या कामांमध्ये दिवसभर स्वतः ला कायम व्यस्त ठेवत चला.
✓ आणि रात्री शांत निवांत गाढ झोप अनुभवा.
५. समाजाशी संपर्क ठेवा
✓ व्यक्ती तितक्या प्रकृती हा समाजाचा न्याय ध्यानात ठेवा. ही भेळ आहे, इथे सर्व प्रवृत्तींनी वागणारी माणसे भेटतील. तेव्हा एक अनुभव म्हणून, मेंदूचा व्यायाम या सकारात्मक दृष्टिकोनातून या अनुभवांकडे पहा. मनाला लावून घेऊ नका.
✓ मित्र मैत्रिणींच्या संपर्कात रहा. मेंदूला चालना देत रहा. आपले अनुभव, नव्या जुन्या आठवणी शेअर करत रहा.
✓ एकटेपणा पूर्णपणे टाळा. टीव्ही पहा, डायरी लिहा, पुस्तके वाचा. घरातल्या घरात कमीतकमी अर्धा पाऊण तास किंवा होईल तितके चाला. पण सक्रीय (Active) रहा.
✓ शरीर आणि मेंदू बऱ्याच चांगल्या गोष्टीं करिता बिझी ठेवा. जेणेकरून इतर कोणत्याही वाईट गोष्टींसाठी त्याच्या जवळ वेळ शिल्लक नसेल.
निष्कर्ष:
• शारीरिक आणि मानसिक आरोग्य ह्या दोन्ही गोष्टींचे एकमेकांशी कायमचे जोडलेले नाते आहेत.
• मन जर आनंदी आणि निरोगी ठेवता आले तर शरीरही आरोग्यपूर्ण राहते.
• शरीर जर निरोगी आणि वेदनामुक्त असेल तर मनही शांत व स्थिर राहते.
आणि म्हणूनच आरोग्याच्या या दोन्ही बाजुंची काळजी आपण घ्यायला हवी. त्यांचे विषयी कायम जागरूक राहायला हवे. शेवटी आपली काळजी आपणच घेणार आहोत.
• निरोगी निवांत स्वच्छ शांत मनासाठी आणि आरोग्यपूर्ण शरीरासाठी भरपूर शुभेच्छा.
• धन्यवाद.
• गुगल डॉट कॉम चे मनापासून आभार 🙏
Comments
Post a Comment