एकांतवासाचे फायदे (Benefits of Loneliness)

मानसिक आरोग्य 

एकांतवासातून  होणारे फायदे (शास्त्रीय दृष्टिकोनातून) 

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत एकांतवास हा नेहमीच एका नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिला जातो. पण पूर्णतः तसे नसून शास्त्रीय संशोधनानुसार एकांतवासाचे अनेक प्रकारचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे आपल्याला सहज आढळून येतात. योग्य प्रमाणात आणि सकारात्मक दृष्टीकोन (Positive Attitude) ठेवून आपण स्वतःहून स्विकारलेला एकांत हा अपार मन:शांती (Mental Peace), सर्जनशीलता (Creativeness) आणि स्वच्छ शांत मानसिक आरोग्यासाठी (Peaceful Mental Life) भरपूर उपयोगी ठरतो.


. मानसिक आरोग्यासाठी उपयोगी (Mental Health Benefits of Solitude)

• मानसशास्त्रानुसार, स्वतःसाठी वेळ देणे आणि एकांतवासाचा स्वीकार करणे तणाव कमी करण्यासाठी खुप उपयोगी समजले जाते. त्या एकांतवासात स्वतः ला स्वतः ची सोबत असते. मनन चिंतन आणि स्वतः सोबत असणारा संवाद इथे मदत करतो.

• सततची गर्दी, इतरांसोबत दिवसभर एकसारखे संभाषण आणि सोशल मीडियासोबत स्वतःला  बांधून ठेवणे यामुळे आपल्याही नकळत आपल्या थकलेल्या मेंदूला दिवसभर चालवत रहातो. पण एकांतात शांत बसल्यावर Cortisol (तणाव निर्माण करणारे हार्मोन) ची पातळी कमी होते आणि Dopamine (आनंददायी हार्मोन) वाढते. 

• त्यामुळे चिंता आणि नैराश्य सहजपणे कमी होते.

२. सर्जनशीलता आणि मनन चिंतन वाढते (Enhances Creativity and Deep Thinking)

• शास्त्रज्ञ आणि लेखक विचारवंत नेहमी या  एकांताचा उपयोग सर्जनशीलता (Creativity) वाढवण्यासाठी करतात.

• संशोधन सांगते की एकांतात राहिल्याने, शांत निवांत बसल्याने मेंदूला नवीन कल्पना सहज सुचत जातात.

• अल्बर्ट आईनस्टाईन आणि न्यूटनसारख्या महान विचारवंतांनी याच  एकांतवासात महत्त्वाच्या वैज्ञानिक शोधांचा विचार केला. तसे शोध लावले ज्याचा लाभ आपण कित्येक पिढ्यांपासून आजवर घेत आलो आहोत.

३. आत्मचिंतन आणि आत्मजाणीव वाढते (Self-Reflection and Awareness)

• एकांत आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्याची संधी देतो. मी कुठे आहे ? मला कोणते बदल स्वतःत करणे आवश्यक आहे ? माझं नेमकं कुठे चुकतंय ? समोरच्या माणसाची चुक मला सहज दिसून येते पण स्वतः च्या  चुका मात्र मी स्व-समर्थनाच्या  पांघरूणात सहज लपवतोय. हे आपण सहज पाहू शकतो.

• दिवसातील काही वेळ एकांतात घालवल्यास आपल्या जीवनातील महत्त्वाच्या निर्णयांबद्दल अधिक स्पष्टता येते. आपल्या गोंधळलेल्या मनासमोर सत्य परिस्थितीचे स्पष्ट चित्र येते.

• ध्यानधारणा आणि योगसाधना यामध्येही एकांताचा खूप महत्त्वाचा वाटा आहे.

४. नातेसंबंध सुधारतात (Improves Relationships)

• आपल्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्याने नातेसंबंध सुधारतात. संशोधनानुसार, शांतपणे प्रत्येक नात्याला घट्ट होण्यासाठी एक वेळ द्यावा लागतो. ज्यामुळे ते नाते सहज घडत, आकार घेत, अखेर संपूर्णपणे तयार होते.

 • स्वतःसोबत वेळ घालवणारी माणसे अधिक चिवट, सहनशील आणि समजूतदार बनतात. त्यामुळे त्यांच्या नातेसंबंधांमध्ये कमालीची सुधारणा होते.

५. कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढते (Boosts Productivity and Focus)

• एकांतात काम केल्याने विचलित करणारे घटक कमी होतात. शास्त्रज्ञांच्या मते, लोक एकटे असताना अधिक एकाग्रतेने काम करतात. त्यामुळे कार्यक्षमता आणि निर्णय क्षमता सुधारते.

. मेंदूची कार्यक्षमता सुधारते (Improves Brain Function)

एकांतात शांत राहिल्यास मेंदूच्या Neuroplasticity (नवीन न्यूरल कनेक्शन निर्माण करण्याची क्षमता) ला चालना मिळते. त्यामुळे नवीन कौशल्ये शिकणे सोपे जाते आणि स्मरणशक्ती वाढते. मेंदू ताजातवाना होतो.


७. शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर (Physical Health Benefits)

तणावमुक्त राहिल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. एकांतात ध्यानधारणा आणि योग केल्याने शारीरिक आरोग्य खूप उत्तम रित्या सुधारते.

निष्कर्ष

• एकांतवास ही केवळ एक नकारात्मक गोष्ट नसून ती बाब अनेक प्रकारे फायदेशीरही ठरू शकते. 

• मानसिक आरोग्य, सर्जनशीलता, आत्मचिंतन, कार्यक्षमता आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी तो उपयुक्त आहे. 

• म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनातला थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेऊया आणि या एकांतवासाचा आपले व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी  आणि आपले उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी  छान उपयोग  करून घेऊया.

स्वच्छ सुंदर मानसिक आणि शारीरिक आरोग्या करिता अनेक शुभेच्छा. 🌹

Comments