कमी बोलण्याचे फायदे (Benefits of Speaking Less)
कमी बोलण्यामुळे होणारे फायदे (Benefits of Speaking Less) आपण दिवसभर न थकता बडबड करत रहातो. घरात , घराबाहेर, मित्र मैत्रिणींध्ये, नातेवाईकांत, परिचितांमध्ये , ऑफिसमध्ये सहकर्मचाऱ्यां सोबत, ट्रेनमध्ये गृप जमवून, सगे सोयरे यांचे सोबत. अगदी भाजीवाला असो किंवा फिरता विक्रेता असो. जो बकरा भेटेल त्याला पकडून आपण अखंड बडबड करत राहतो. जणू एखादा जन्मसिद्ध हक्कच बजावतो. पण हीच सवय आपलं बरंचसं नुकसान करून जाते. समाजात आपले परिचित सतत आपले नको तितके सततचे बोलणे ऐकून अगदी कंटाळून जातात. आणि यातून सामाजिक अलगाव निर्माण होऊ शकतो आणि अर्थपूर्ण नाती जोपासण्यात, आणि आपल्या माणसांशी संवाद साधण्यात खरंच खूप अडचणी येऊ शक तात. पाहूया काय असू शकते हे नुकसान... सामाजिक आणि नातेसंबंधांवर होणारे परिणाम: १) नातेसंबंध बिघडणे: जेव्हा कोणी खूप जास्त बोलते, तेव्हा इतरांच्या मनात, "हा माझे ऐकत नाही, स्वतः चीच टिमकी वाजवतो" अशी भावना निर्माण होते. अशा बोलणाऱ्याला कमी भाव दिला जाण्याची भावना यातून येऊ शकते. यातून नातेसंबंध तणावग्रस्त होतात. आणि हळूहळू या...